शरीर सुकविण्यासाठी ही मुलगी वापरते हेअर ड्रायर पण का ?

story-girl
अमेरिकेच्या टेक्ससमध्ये राहणारी एक 20 वर्षीय मुलीचे शरीर काही क्षणांतच ओले होत आहे. त्यामुळे या मुलीला शरीर कोरडे ठेवण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक उपकरण जवळ ठेवावे लागते.
story-girl1
या मुलीचे नाव सोफी ड्वेर आहे. सोफी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोफीला एक आजार आहे, त्यामुळे तिच्या शरीराला सामान्य माणसापेक्षा 10 पटीने जास्त घाम येतो. या समस्येमुळे सोफीचे आयुष्य खूप कठीण झाले आहे. या आजारामुळे तिला दररोज 6 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.
story-girl2
माध्यमांच्या अहवालानुसार, जेव्हा सोफीला खूप त्रास होऊ लागला तेव्हा तिच्या पालकांनी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की, सोफीला हाइपरहाइड्रोसिस नावाचा एक रोग आहे. हा रोग प्रत्येक 200 लोकांमध्ये एकाला होतो.
story-girl3
हायपरहायड्रोसिस आजार असल्यास शरीरातून जास्त प्रमाणात घाम येतो. सोफीच्या शरीराला ही मोठ्या प्रमाणात घाम येते. त्यामुळे तिला दिवसांतून अनेकदा कपडे बदलावे लागतात. सोफी म्हणते की, ‘कपडे ओले झाल्यामुळे मला लोकांमध्ये जायला लाज वाटते. माझ्या या आजारामुळे मला प्रियकर सोडुन गेला आहे. त्यामुळे मला आता कोणाबरोबरही डेटींग करण्याची भीती वाटते. ‘
story-girl4
हिवाळ्यामध्ये तिला अनेक समस्यांना तोड द्यावे लागते, कारण ती गरम कपडे घालते मात्र घाम आल्यावर शरीर जास्त थंड पडते. जेव्हा सोफी बाहेर पडते, तेव्हा ती नेहमी तिच्यासोबत हेअर ड्रायर ठेवते. बाहेर गेल्यावर जेव्हा घाम येते तेव्हा हेअर ड्रायरने ती शरीराला सुकवते.

Leave a Comment