जनतेच्या पैशातून पुतळे बांधणा-या मायावतींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

mayawati
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप प्रमुख मायावती यांना फटकारले असून मायावतींनी मुख्यमंत्री असताना स्वत:चे पुतळे बनवले होते. त्याचबरोबर राज्यात त्यांनी पक्षचिन्ह असलेले हत्तींचेही पुतळे उभारले होते. यावर जनतेचे खर्च केलेले पैसे परत करावे, असे आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मायावतींना दिले आहेत.

मायावतींच्या २००९च्या कार्यकाळात बनवण्यात आलेल्या पुतळ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना मायावतींना जनतेचा पैसा परत करण्याचे आदेश दिले आहेत. २ एप्रिल याप्रकरणी पुढील सुनावणी रोजी होणार आहे. मे महिन्यानंतर प्रकरणाची सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी मायावतींच्या वकिलांनी केली होती. पण, ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

Leave a Comment