कुमारस्वामींनी उघड केली ‘ऑपरेशन कमळ’ची ऑडिओ क्लिप

kumarswamy
बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मित्रांसह मिळून लोकशाही उद्धवस्त करत असल्याची टीका केली आहे. तसेच कुमारस्वामी यांनी यावेळी ‘ऑपरेशन कमळ’ची (भाजप) ऑडिओ क्लिप सर्वांसमोर जाहीर केली आहे. या क्लिपमध्ये भाजप नेते कर्नाटक सरकारमधील आमदारांना फोडण्यासाठी ‘ऑफर’ देत आहेत.

कर्नाटकमधील भाजपच्या नेत्याने जदयू आणि काँग्रेसच्या संयुक्त सरकारमधील आमदारांना मोठी ऑफर दिली, याचे तपशील त्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहेत. कुमारस्वामी यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये येदियुरप्पा आणि जेडीएस नेते नगनगौडा कंडकूर यांचे पुत्र शरणगौडा कंडकूर यांच्यात झालेला संवाद आहे. जेडीएस सरकारमधील या आमदाराला भाजप नेत्यांनी २४ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. तसेच आपल्या वडिलांना ( नगनगौडा ) त्यांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती, असे शरणगौडा यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान मोदींना या सगळ्या प्रकाराची माहिती नव्हती हे शक्य आहे का, असा प्रश्न विचारत कुमारस्वामी यांनी मोदींवर टीका केली आहे. तीन फोन कॉल्स मला आले होते. येदियुरप्पा देवदुर्गमध्ये असून त्यांना मला तिथे बोलावले असल्याचे मला फोनवरुन सांगण्यात आले. मुख्यमंत्री कुमारस्वामींना मी माझा फोन कनेक्ट केला. त्यांनी पूर्ण संवाद ऐकला. मी म्हणालो मी माझ्या वडिलांशी बोलून तुम्हाला परत कॉल करतो. मला कोणालाही ट्रॅप करायचे नव्हते. मात्र, माझी वैयक्तिकरित्या देवेगौडा कुंटुंबाशी जवळीक आहे. मला येदियुरप्पा याविषयी बरेच बोलले. मात्र, मी यावेळी माझा प्रामाणिकपणा दाखविला, असेही शरणगौडा यांनी सांगितले.

Leave a Comment