‘या’ देशात बॉर्डर पार करुन मुले घेतात शिक्षण

children
अमेरिकेत कोलंबस प्राथमिक शाळा आहे. या शाळेत अनेक मुले आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडुन शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र पासपोर्ट शिवाय मुलांना शिकणे फार कठीण आहे. या शाळेत एकुण 600 मुले शिकत आहेत. त्यापैकी 420 मुले ही आंतरराष्ट्रीय सीमा पार करुन येतात.
children1
एका अहवालानुसार, मेक्सिकोच्या प्योर्तो पालोमसमधील अनेक मुले आहेत, ज्याचा जन्म अमेरिकेत झाला आहे. परंतु ही जागा मेक्सिकोमध्ये येते म्हणून येथे राहणा-या मुले किंवा इतर लोकांना अमेरिकेत जाण्यासाठी पासपोर्टची गरज भासते.
children2
पालोमसमध्ये राहणारे मुले शाळेत जातानां पासपोर्ट जवळ ठेवतात. जेव्हा ही मुले अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोहचतात तेव्हा आपला पासपोर्ट कस्टम क्लिअरन्ससाठी तिथे असलेल्या अमेरिकी गार्डकडे देतात. क्लिअरन्स मिळाल्यानंतर मुले अमेरिकेच्या सीमेवर दाखील होतात.
children3
शाळेची बस सीमा जवळ असलेल्या बस स्टॉपवर येते आणि ही मुले या बस मधुन आपल्या शाळेत जातात. मेक्सिकोतील शाळेत स्पॅनिशमध्ये शिकवले जाते, तर अमेरिकन शाळांना इंग्रजीत शिक्षण दिले जाते.
children4
पालोमासमध्ये राहणारे लोक म्हणतात की, सीमा ओलांडून या मुलांना याच शाळेत पाठविले जाते कारण त्यानां चांगले शिक्षण मिळावे आणि ते इंग्रजी शिक्षण घेऊ शकतील. मेक्सिकोच्या लोकांचे असे मानतात की इंग्रजीमध्ये शिक्षण हेच मुलांचे उज्जवल भविष्य आहे.

Leave a Comment