हावडा ब्रिजची पंच्याहत्तरी

howrah
कोलकाता येथील जगप्रसिद्ध हावडा ब्रिजने त्याची पंच्याहत्तरी नुकतीच म्हणजे ३ फेब्रुवारीला साजरी केली आहे. देशातीलचा नव्हे तर विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला हा पूल मुळात कोलकाता आणि हावडा यांना जोडण्यासाठी हुगळी नदीवर बांधला गेला. त्याचे काम सुरु झाले १९३६ साली आणि तो बांधून पूर्ण झाला १९४२ मध्ये. मात्र प्रत्यक्षात तो सर्वांसाठी खुला केला गेला ३ फेब्रुवारी १९४३ साली. विशेष म्हणजे या पुलाचा औपचारिक उद्घाटन केलेच गेले नव्हते कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरु होते आणि जपानने हा पूल नष्ट करण्यासाठी त्यावर तुफान बॉम्बवर्षाव केला होता.

हा पूल अनेक अर्थाने महत्वाचा आहे. इतिहासाचा तो मोठा साक्षीदार आहे. त्याने स्वतंत्रता आंदोलन पहिले, दुसरे महायुद्ध पहिले, देश स्वतंत्र झाला ते पहिले आणि बंगालचा भयानक दुष्काळही पहिला. १९ व्या शतकाच्या अखेरच्या दशकात जेव्हा तो बांधण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा हुगळी नदीतून जहाज वाहतूक मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे हा पूल तरंगता असावा असे ठरविले गेले. त्यासाठी १८७१ मध्ये हावडा ब्रिज अॅक्ट पास केला गेला.

bridge
या पुलासाठी २६५०० तन स्टील वापरले गेले त्यातील २३५०० टन टाटा स्टीलने पुरविले होते. तयार झाल्यावर तो त्या काळाचा जगातला ३ नंबरचा लांब पूल होता. नदीच्या दोन तीरावर २८० फुट उंच पायांवर हा पूल तोलला गेला आहे. आज रोज किमान लाखाहून अधिक वाहने आणि ५ लाख पादचारी या पुलावरून रोज येजा करतात. ब्रिज बनल्यावर त्यावरून सुरवातीला ट्राम जात असे.

अनेक चित्रपटातून हा पूल दिसला असून १९६५ साली त्याचे नामकरण रवींद्र सेतू असे केले गेले आहे. मात्र हावडा ब्रिज हेच त्याचे नाव आजही लोकांच्या ओठावर आहे.

Leave a Comment