चला सेंट व्हेलेंटाईनच्या गावाला

valen
१४ फेब्रुवारीला जगभरात मोठ्या उत्साहाने व्हेलेंटाईन डे साजरा केला जात असला तरी त्याची सुरवात ७ फेब्रुवारी पासून होते. प्रेम व्यक्त करणे, रागावून गेलेल्याला मनाविणे आणि प्रेम मिळविणे यासाठी साजरा होणारा हा दिवस ख्रिस्चन संत व्हेलेंटाईन याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. रोमचा राजा क्लॉडीअर याने व्हेलेंटाईनला ३ ऱ्या शतकात फाशीची शिक्षा दिली होती. व्हेलेंटाईनला १४ फेब्रुवारीला हि शिक्षा दिली गेली त्यामुळे या दिवशी व्हेलेंटाईन डे साजरा केला जातो.

saint
फ्रांस मध्ये व्हिलेज ऑफ लव्ह असे नाव एका गावाला दिले गेले असून हे नाव सेंट व्हेलेंटाईनने दिले होते असे सांगतात. फ्रांसच्या लॉंयर व्हॅलीमध्ये असलेल्या या गावाच्या हवेतच प्रेम भरलेले आहे. व्हेलेंटाईन पाद्री होता. राजा क्लॉडीअसचे म्हणणे होते अविवाहित पुरुष अधिक चांगले सैनिक आणि अधिकारी बनू शकतात त्यामुळे त्याने सैनिक आणि अधिकारी यांना लग्न करण्यास बंदी घातली होती. सेंट व्हेलेंटाईनने याला विरोध केला आणि अनेक सैनिक आणि सैन्य अधिकाऱ्यांची गुपचूप लग्ने लावून दिली. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्याने फासावर चढतानाही जेलरच्या अंध मुलीला आपले डोळे दान केले त्यावेळी जेकोबास नावाच्या या मुलीला लिहिलेल्या चिठ्ठीवर त्याने युवर व्हेलेंटाईन असे लिहिले होते. तेव्हापासून प्रिय व्यक्तींना व्हेलेंटाईन म्हणण्याची प्रथा सुरु झाली.

garden
व्हेलेंटाईनच्या या चिमुकल्या गावात १२ ते १४ फेब्रुवारी असे तीन दिवस व्हेलेंटाईनचा उत्सव साजरा होतो. या निसर्गसुंदर गावात जागोजागी फुले दिसतात आणि या दिवसात आपण प्रेम व्यक्त केले तर ते सफल होते असे मानले जाते. येथे एक लव्हर्स गार्डन आहे. छोट्या तलावाकाठी वडाचे झाड असून या झाडावर लव्ह लॉक अडकून प्रेमी त्याची किल्ली शेजारच्या तलावात फेकून देतात. आता मात्र लव्ह नोट लिहून ती झाडावर टांगली जाते. हे कागद हृदयाच्या आकाराचे असतात. येथे एक ट्री ऑफ इटर्नल हार्टस असून या झाडाखाली अनेक जोडपी लग्न करतात आणि आयुष्यभर जोडीदाराबरोबर इमानदार राहण्याची शपथ घेतात. गावात अनेक लोक प्रेम व्यक्त करतात आणि त्याची खूण म्हणून झाडे लावतात. येथे एक पोस्टबॉक्स असून त्यात प्रेमी लव्ह लेटर्स टाकतात.

Leave a Comment