मोदी/दीदी = मोदी, हिशोब बरोबर, परेश रावल यांचा ममता बॅनर्जींना टोला

paresh-rawal
मुंबई – सध्याच्या घडीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अनेकदा भाजप नेत्यांना बंगालमध्ये प्रचार करण्यापासून ममता थांबवत आहेत. सीबीआयचा भाजप सरकार जाणीवपूर्वक उपयोग करून आपल्याला लक्ष्य करत असल्याचे ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. आता याला परेश रावल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.


गणितातील एक सूत्र परेश रावल यांनी एक ट्विट करत लिहिले आहे. सध्या सोशल मीडियावर जे चांगलेच चर्चेत आहे. रावल यांनी मोदी/दीदी = मोदी, हिशोब बरोबर, असे ट्विट करत ममता यांना चांगलाच टोला लगावला आहे. त्यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मोदी आणि ममता यांच्यात लढाई झाली तर ममता यांचे काहीही राहणार नाही, असे रावल यांनी अप्रत्यक्षरित्या आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.

Leave a Comment