अरब जगतात पहिल्यांदाच महिला बनली गृहमंत्री

lebnon
लेबनॉनच्या नवीन गृहमंत्री रया अल हसन यांनी बुधवारी आपल्या पदाची सूत्रे घेतली. लेबनॉन आणि अरब जगतात शक्तिशाली मानले जाणारे गृह मंत्रालय सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

लेबनॉनच्या मंत्रिमंडळात 30 जणांचा समावेश करण्यात आला असून त्यात चार महिला आहेत. लेबनॉनमधील राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी आहे, असे असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

रया अल हसन या 51 वर्षांच्या असून 2009 मध्ये एखाद्या अरब देशात अर्थमंत्री होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कायद्याची अंमलबजावणी आणि नागरीकांची सेवा हे एक आव्हान असून आपण हे आव्हान स्वीकारत आहो, असे अल-हसन यांनी म्हटले आहे.

“खरे सांगायचे तर ही एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती परंतु मला नक्कीच अभिमान वाटतो,” असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान साद हरिरी यांनी नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले असून जवळजवळ नऊ महिन्यांच्या अंतराने हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आहे.

“लेबनानी स्त्रियांचा अभिमान वाटतो, चार महिला मंत्र्यांचा अभिमान वाटतो, अरब राष्ट्रांतील पहिल्या महिला गृहमंत्र्याचा अभिमान वाटतो, भविष्याचा अभिमान वाटतो आणि लेबनॉनचा अभिमान वाटतो,” असे श्री हरिरी यांनी ट्विट केले.

Leave a Comment