छोट्या अंबानींची दिवाळखोरी मोठ्या अंबानींच्या फायद्याची

divalkhori
उद्योगपती अनिल अंबानी यांनी त्यांची आर कॉम दिवाळखोर कंपनी ठरविण्यास्ठी मुंबईत शुक्रवारी अर्ज केला असून तो न्यायालयाने मान्य केला आहे. परिणामी आर कॉम दिवाळखोर कंपनी म्हणून जाहीर केली जाण्याची शक्यता वाढली आहे. याचा सर्वाधिक फायदा अनिल अंबानी यांचे मोठे बंधू रिलायंस उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना होणार असल्याचा दावा केला जात आहे.

अनिल अंबानी यांनी त्यांच्याकडे असलेले आर कॉमसाठीचे टॉवर, स्पेक्ट्रम, फायबर आणि अन्य अॅसेट जिओ टेलिकॉमला विकण्याची परवानगी मागितली होती मात्र हा सौदा अयशस्वी झाला. कारण कर्जदार बँकांनी जिओ बरोबरचा सौदा होण्यापूर्वी कर्जफेड करावी अशी मागणी केली होती. आता कंपनी दिवाळखोर ठरली कि अनिल अंबानी यांना रिपेमेंट आणि संपत्ती विक्रीसाठी २७० दिवसांची मुदत दिली गेली आहे. त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल. ब्लुमबर्गच्या अहवालानुसार आर कॉमची मालमत्ता घेण्यात रस असलेली जिओ ही एकमेव कंपनी आहे.

कंपनी दिवाळखोरीत गेली कि त्यांच्या मालमत्तेची किंमत संपलीच असा त्याचा अर्थ आहे. परिणामी कंपनीच्या ज्या मालमत्तेसाठी जिओने पैसा मोजण्याची तयारी केली होती तिचा मालमत्ता आता जिओला कवडीमोल भावात मिळू शकणार आहे. याचाच अर्थ छोट्या अंबानीची दिवाळखोरी मोठ्या अंबानींच्या फायद्याची ठरणार आहे अशी चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment