कोणतीही कार बनू शकणार ड्रायव्हरलेस

driver
सध्या जगभरातील ऑटो कंपन्या चालकविरहीत कार बनविण्याच्या उद्योगात आहेत. अमेरिकन कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सने यात आघाडी घेऊन कोणतीही सर्वसामान्य कार चालकविरहित करून देण्यासाठीची सिस्टीम तयार केली असून त्याच्या पेटंट साठी अर्ज दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जनरल मोटर्सने युएस स्टेट्स पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जात सिस्टीम फॉर रेट्रोफिटिंग व्हेइकल ऑटोमेशनचा उल्लेख केला आहे. याचाच अर्थ जनरल मोटर्स सामान्य वाहनांना सेल्फ ड्रायविंग मध्ये बदलण्यासंदर्भात काम करत आहे असा काढला गेला आहे. त्यासाठी कारचे सुटे भाग, स्टिअरिंग, पेडल मध्ये मोटर व सेन्सरचा वापर केला जाईल. या कारमध्ये ऑटोनोमस सिस्टीम लावल्या तर स्मार्टफोनच्या सहाय्याने कार कंट्रोल करता येणार आहे. अशी कार आपोआप पार्क होईल आणि मालकाने बोलावले कि स्वतः मालाकाजवळ येईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment