हिटलरने रेखाटलेल्या चित्रांचा जर्मनीत लिलाव

hitler
जर्मनीचा नाझी हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलर याने रेखाटलेल्या आणि त्याची सही असलेल्या काही पेंटिंगचा लिलाव जर्मनीत विंडलर ऑक्शन तर्फे केला जाणार आहे. ऑक्शन हाउसच्या वेबसाईटवर त्याची माहिती दिली गेली आहे. ही सर्व पेंटिंग ऑस्ट्रिया आणि युरोप मधील खासगी संग्रहाकांकडून मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.

या पेंटिंगवर ए. हिटलर अशी हिटलरची सही आणि मोनोग्राम आहे. अशी ३० पेक्षा अधिक पेंटिंग लिलावात विक्रीसाठी मांडली जाणार आहेत. चारकोल मधील पेंटिंगसाठी ३० डॉलर्सपासून बोली लावली जात असून जलरंगातील चित्रासाठी सर्वाधिक ४५ हजार युरो पर्यंत बेस प्राईज लावली गेली आहे.

हिटलर तरुणपणी व्हिएन्ना येथे राहत असे तेव्हा त्याने व्हिएन्ना अॅकॅडमी ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र त्याला तेथे प्रवेश मिळाला नव्हता.

Leave a Comment