असे देव आणि अशी मंदिरे

bhoot
भारताच्या कुठल्याची भागात गेलात तर किमान एक तरी मंदिर दिसेलच. अगदी लहान देवळ्यापासून मोठ्या मंदिरापर्यंत सर्व प्रकारची मंदिरे, दर्गे येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे प्रत्येक देवळामागे काहीतरी कथा असते. अशाच काही अद्भुत मंदिर आणि दर्ग्याची ही माहिती.

सध्या परीक्षांचे दिवस आहेत त्यामुळे विद्यार्थी चांगले मार्क मिळावे यासाठी देवाला साकडे घालतात. गुजराथेतील सुरत शहरात आठवागोट भागात असेच एक छोटेसे बंजारा भूतमामा मंदिर आहे. या भूतमामावर लोकांची अपार श्रद्धा आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी चांगले मार्क मिळावे म्हणून भूतमामा ला सिगरेट अर्पण करतात. अश्या रोज किमान ५० सिगारेट मामाला मिळतात. पुजारी सांगतात १५० वर्षापूर्वी येथे बंजारा टोळी आली होती. त्यावेळी दुष्काळ पडल्याने त्यातील एकजण मरण पावला. त्याची समाधी बांधली गेली आणि हीच समाधी बंजारा भूतमामा म्हणून प्रसिद्ध झाली. येथे हिंदू मुस्लीम कुणीही सिगरेट अर्पण करून नवस बोलतात.

majar
लखनौ येथे मुसाबाग भागात असाच एक सर्वधर्मीय दर्गा आहे. त्याला कप्तान बाबा दर्गा म्हटले जाते. हा एक ख्रिश्चन ब्रिटीश सैनिक होता आणि १८५८ च्या लढतील तो शहीद झाला. त्याचे नाव होते कॅप्टन वेल्स. त्याला सिगरेट आणि दारू आवडत असे, त्यामुळे त्याच्या या दर्ग्यात सिगरेट आणि दारू वाहिली जाते. हा कप्तान बाबा लोकांच्या इच्छा पूर्ण करतो असा भाविकांचा विश्वास आहे.

jeeva
गुजरात राज्यात दारूबंदी असली तरी बडोद्याच्या माज्लापूर भागात असलेल्या जीवा मामा मंदिरात जीवा मामाला दारू वाहिली जाते. सिगरेटही दिली जाते. अनेक वर्षापूर्वी जीवा नावाचा एक युवक याच्या बहिण आणि भाच्याला भेटायला आला होता तेव्हा गावावर दरोडा पडला. जीवाने या दरोडेखोरांशी दोन हात करून त्यांना पळवून लावले आणि गाव वाचविले. मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला तेव्हापासून जीवामामा गावासाठी दैवत बनला आहे. त्याला दारू आणि सिगरेट आवडत असे म्हणून त्याला याच वस्तूंचा नैवेद्य दाखविला जातो.

Leave a Comment