स्त्रियांची बुद्धी पुरुषांपेक्षा तल्लख !

woman
वॉशिंग्टनः स्त्रियांची बुद्धी समवयस्क पुरुषांच्या तुलनेत तीन वर्ष अधिक तरुण आणि तल्लख असते. म्हणुन स्त्रियांचा ची बुद्धी दीर्घकाळ जलदगतीने चालते. असा दावा संशोधकांनी आपल्या संशोधनात केला आहे.

भारतीय शास्त्रज्ञ याबाबत माहिती मनु गोयल म्हणाले की, आम्ही समजून घेण्यास सुरुवात केली आहे की विभिन्न लिंगामुळे बुद्धी कमी होण्यावर कसा परिणाम होते. त्यांनी सांगितले की, मेंदूतील चयापचया संबंधित प्रक्रिया स्त्री आणि पुरुषाचे वय वाढल्यानंतर त्याच्या मेंदूतील फरक समजण्यास मदत होईल. मेंदू हा साखरेच्या प्रमाणावर चालतो. परंतु मेंदू साखरेचा वापर कसा करतो तसेच वय वाढल्यानंतर त्याच्यात बदल होत असतो.

हे संशोधन “प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेज जर्नल” मध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी 205 लोकांवर अभ्यास केला आणि शोधून काढले की, शरीरात साखरेचा कशा प्रकारे वापर केला जातो. या संशोधनात 20 ते 84 वर्षे 121 स्त्री आणि 84 पुरुष सहभागी झाले होते. त्यांच्या मेंदूमध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा प्रवाह मोजण्यासाठी त्यांचे पीईटी स्कॅन केले गेले.

त्यानंतर त्यांनी वय आणि मेंदुच्या क्रिया यांच्या दरम्यानचा संबंध शोधून काढण्यासाठी एक मशीनमध्ये पुरुषांची वय आणि मेंदूच्या क्रियांचा डेटा घेतला. संशोधकांनी स्त्रियांच्या मेंदुची क्रियांचा डेटा मशीनमध्ये घेतला आणि आकडेवारीनुसार स्त्रियांच्या बुद्धीच्या वयाची मोजणी केली. यात स्त्रियांच्या वास्तविक वयापेक्षा त्यांच्या बुद्धीची वय 3.8 वर्ष जास्त दिसुन आले.

त्याचप्रमाणे पुरुषांच्या बुद्धीचे (आकलन) वय काढण्यात आले. मात्र पुरुषांचे वास्तविक वयपेक्षा बुद्धीचे वय 2.4 वर्ष जास्त दिसुन आले. गोयल यांनी म्हटले की, असे नाही की पुरुषांची बुद्धी वेगाने वाढत आहे. पण पुरुषांचा मेंदू स्त्रियांच्या तुलनेने तीन वर्षानंतर वाढतो.

Leave a Comment