शीखविरोधी दंगलींच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारची एसआयटी

up1

लखनऊ : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर कानपूरमध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने चार सदस्यीय विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे. उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलिस महासंचालक अतुल यांच्या नेतृत्वाखालील या पथकात निवृत्त अतिरिक्त संचालक (कार्यवाहक) योगेश्वर कृष्ण श्रीवास्तव आणि निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुभाषचंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही या पथकाचा भाग असतील.

एसआयटीला सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वक्तव्यात देण्यात आली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, 31 ऑक्टोबर 1984 रोजी गांधी यांच्या शीख अंगरक्षकाने केलेल्या हत्येनंतर या दंगली उसळल्या होत्या. त्यानंतर या शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. त्यात संपूर्ण भारतात 2,800 शीख मारले गेले होते, त्यांपैकी 2100 शीख एकट्या दिल्लीत मारले गेले होते. दिल्लीनंतरची सर्वात भीषण दंगल कानपुरमध्ये झाली होती आणि तेथे 127 शीख मारले गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला नोटिस जारी केली होती.

Leave a Comment