इस्त्रोकडून ४०व्या संदेशवाहक उपग्रह जीसॅट- ३१ चे यशस्वी प्रक्षेपण

ISRO
नवी दिल्ली – ४०वे संदेशवाहक उपग्रह जीसॅट- ३१ चे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण केले. बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून या उपग्रहचे प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर सुमारे ३ वाजून १४ मिनिटांनी स्थापित झाला. युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन-५ रॉकेटने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

२५३४ किलोग्रॅम जीसॅट- ३१ या उपग्रहाचे वजन असून तो पुढील १५ वर्ष कार्यरत राहणार आहे. भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता यामुळे वाढेल. दरम्यान जीसॅट- ३१ याआधीच्या इनसॅट – ४ सीआर उपग्रहाची जागा घेणार आहे. इनसॅट – ४ सीआर उपग्रहाचा कार्यकाळ संपला असून लवकरच हा उपग्रह निकामी होईल.


कोणतीही समस्या प्रक्षेपणात आली नसून एरियन स्पेस आणि इस्त्रोचे अधिकारी जानेवारीपासून या प्रक्षेपणासाठी येथे उपस्थित होते, अशी माहिती सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक एस पांडियन यांनी दिली. दरम्यान, यावर्षी जुलैमध्ये भारताकडून याच प्रकारचा आणखी एक जीसॅट -३० उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment