सरफराज अहमदवर पीसीबीचा भरवसा कायम

sarfaraz-ahamed
कराची – पाकिस्तानी संघाचा कर्णधार सरफराज अहमदवर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अॅन्डाईल फेहलुकवायोवर वर्णभेदी टिप्पणी केल्यानंतर चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर त्याला आयसीसीने यासाठी ४ सामन्यासाठी निलंबित केले. सरफराजला यानंतर आफ्रिका दौ-यातून मायदेशात माघारी यावे लागले होते.

सरफराजला या सर्व प्रकरणानंतर यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत कर्णधारपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण सरफराजवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वास ठेवताना त्याला इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार घोषित केले आहे.

याबाबत माहिती देताना पीसीबीचे अध्यक्ष म्हणाले, की सरफराज विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघासाठी महत्त्वाचा आहे. तो एक चांगला खेळाडू आणि कर्णधार आहे. संघासाठी तो चांगल्या रणनिती बनवतो. पाकिस्तानने त्याच्या नेतृत्वात आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टी-20 क्रमवारीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आला. सरफराजच्या कर्णधारपदाचे मुल्यांकन विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर केले जाईल.

सरफराजवर विवादीत टिप्पणी केल्यानंतर टीका झाली होती. त्याने यानंतर, वैयक्तिक फेहलुकवायोची भेट घेत त्याची माफी मागितली होती. सोबतच आफ्रिकेच्या नागरिकांचीदेखील माफी मागितली होती. हा सर्व प्रकार सरफराजने सोशल मीडियावर शेअर केला होता.

Leave a Comment