टायगर श्रॉफसोबत काम करण्यास सारा अली खानचा नकार

sara-ali-khan
‘केदारनाथ’ चित्रपटातून स्टार किड सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉक्स ऑफिसवर तिच्या पहिलाच चित्रपटाला चांगले यश मिळाले. सारा केदारनाथ नंतर रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’मध्ये दिसली. साराकडे केदारनाथच्या रिलीज आधीच चित्रपटांची रांग लागली आहे. टायगर श्रॉफच्या ‘बागी3’ चा देखील या लिस्टमध्ये समावेश आहे. टायगर श्रॉफच्या अपोझिट ‘बागी3’साठी साराला अप्रोच करण्यात आले होते. पण टायगरसोबत काम करण्यास साराने नकार दिल्याचे वृत्त आहे.

रिपोर्टनुसार, चित्रपटातील भूमिका बघून साराने नकार दिला आहे. यात साराची फारशी मोठी भूमिका नव्हती. ती फक्त काही वेळासाठीच स्क्रिनवर होती, हे बघून साराने ‘बागी3’साठी नकार दिल्याचे वृत्त आहे. चित्रपट रिजेक्ट करण्याची साराची ही पहिलीच वेळ नाही, तिने याआधी ही असे केले आहे.

सारा ‘लव्ह आज कल २’ चित्रपटात देखील झळकणार होती मात्र चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे तिने या चित्रपटातूनदेखील माघार घेतली आहे. पहिल्यांदाच मला लव्ह आज कल २च्या माध्यमातून वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण माझ्या वाट्याला चित्रपटात चांगली भूमिका आली असती तर मी नक्कीच या चित्रपटाचा विचार केला असता. माझी या चित्रपटामध्ये भूमिका केवळ नावापुरती असल्यामुळे या चित्रपटासाठी मी माझा नकार दिला आहे, असे साराने एका मुलाखतीत सांगितले होते.

Leave a Comment