आरएसएस देशातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना – सी. विद्यासागर राव

vidayasagar-rao
नागपूर – राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने उधळताना संघाने नेहमीच मानवी हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्यांचा आदर केल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना असल्याचे म्हटले आहे. विद्यासागर राव कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठात नवीन शैक्षणिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हटविण्यासाठी गोळवलकर यांचे मोठे योगदान होते. संघावरची बंदी त्यांच्यामुळेच हटविण्यात आली, असे ते म्हणाले. गोकळवलकर गुरुजी युगपुरुष होते. विद्यापीठ परिसरात शैक्षणिक संकुल त्यांच्या नावाने उभारणे, ही अभिमानाची गोष्ट असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर जी बंदी हटविण्यासाठी त्यांनी देशभर केलेले दौरे आणि मेहनत कामी आली. गोळवलकर यांचा गांधी हत्येनंतर संघाच्या प्रचार आणि प्रसारात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे संघाचा विस्तार झाला, असे ते म्हणाले.

विद्यासागर राव लालकृष्ण अडवाणी यांचा किस्सा सांगताना म्हणाले, संघाची घटना लिखित नसल्यामुळे गोळवलकर यांनी संघावर बंदी घालण्याच्या आदेशाला इंग्लंडची घटना देखील लिखित नसल्यामुळे त्यावर बंदी आहे का? असा युक्तिवाद अडवाणी यांच्यासोबत केला होता. यावेळी विद्यासागर राव यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Comment