पंजाब नॅशनल बँकेचा सुखद धक्का – तिसऱ्या तिमाहीत उत्तम कामगिरी

pnb

हिरे व्यापारी नीरव शाह याच्या गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे अर्थतज्ञांना सुखद धक्का बसला असून शेअर बाजारात बँकेचे भाव वधारला आहे.

मंगळवारी बँकेच्या व्यवस्थापनाकडून तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर करण्यात आले. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेला 7.12 टक्क्यांचा निव्वळ नफा झाला असून ही रक्कम 246.05 पाच कोटी रुपये एवढी आहे. बँकेची जोखीम आणि देणी कमी झाल्यामुळे हा फायदा झाला असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

“या तिमाहीत बँकेने 2014.04 कोटी रुपयांची रक्कम देणी चुकविण्यासाठी बाजूला ठेवली आहे. त्यामुळे ब्रॅडी हाऊस शाखेत झालेल्या गैरव्यवहाराची पूर्ण तजवीज आम्ही केली आहे, ” असे बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे निकाल जाहीर झाले तेव्हा दिवस अखेर पीएनबीच्या शेअरचे भाव 0.55 टक्यां म् नी वाढून 73.55 रुपयांवर पोचले होते.

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी शाखेत एक हजार 771 मिलियन डॉलरचा (11 हजार 360 कोटी रुपये) गैरव्यवहार 2017 मध्ये समोर आला होता. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाली होती. नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे ही फसवणूक केली होती. त्यानंतर नीरव मोदी बेल्जियमला पळून गेला होता.

Leave a Comment