यूएईच्या इंटरफेथ संमेलनात सहभागी होणार पोप फ्रान्सिस

pop-francies
अबुधाबी – संयुक्त अरब अमीरातीच्या (यूएई) दौऱ्यावर पोप फ्रान्सिस असून ते असा दौरा करणारे पहिले पोप आहेत. एका इंटरफेथ संमेलनात सहभागी होण्यासाठी पोप यांना अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी आमंत्रित केले होते.

ते या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान एका धार्मिक सभेत (मास) सहभागी झाले. या वेळी सुमारे १ लाख २० हजार लोक उपस्थित होते. पोप फ्रान्सिस यांचे यूएईमध्ये आम्ही स्वागत करत आहोत. सहिष्णुता, समभाव आणि परस्परांशी संवाद या मूल्यांसाठी हा ऐतिहासिक दौरा महत्त्वाचा ठरणार आहे, असे क्राउन प्रिन्स यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय, आम्ही मानवता, आमची सामान्य मूल्ये मानवजातीच्या भविष्यासाठी विश्वासाच्या आधारावर एकमेकांशी जोडले गेलो आहोत. यूएईमध्ये तुमचे स्वागत आहे, असेही क्राउन प्रिन्स यांनी म्हटले आहे. यूएईमध्ये सुमारे १० लाख रोमन कॅथलिक लोक राहतात. यांपैकी बहुतेक भारत आणि फिलिपाईन्समधून गेलेले आहेत.

Leave a Comment