राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पाहण्यासाठी आता ऑनलाईन बुकींग

mughal-garden
नवी दिल्ली – आजपासून देश-विदेशातील नागरिकांचे आकर्षण केंद्र असलेले राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान गार्डनला पर्यटकांना भेट देता येणार आहे. निळा, लाल, गुलाबी, काळा, पिवळा, पांढरा, हिरवा, अशा विविध रंगांच्या १३५ जातींचे गुलाब आणि ७० जातींचे फुले या गार्डनमध्ये पाहायला मिळणार आहेत.

या गार्डनमध्ये दरवर्षी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. गार्डन प्रशासनाने यावर उपाय म्हणून ऑनलाईन तिकीटांचा पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आता पर्यटकांना rashtrapatisachivalaya.gov.in या संकेतस्थळावरून या गार्डनची तिकीटे बुक करता येणार आहेत. मात्र, ऑनलाईन बुकींगचा लाभ घेण्यासाठी पर्यटकांना ७ दिवसआधी बुकींग करावी लागणार आहे. ६ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मुगल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. दरम्यान ११ मार्चला सैनिक, पोलीस, दिव्यांग आणि शेतक-यांच्या कुटुंबीयांसाठी गार्डन खुले राहणार आहे.

Leave a Comment