महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; हार्दिक-राहुल-करण विरोधात गुन्हा दाखल - Majha Paper

महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; हार्दिक-राहुल-करण विरोधात गुन्हा दाखल

trio
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची चांगलीच किंमत मोजवी लागत आहे. राजस्थानमध्ये हार्दिक पांड्या, लोकेश राहुल आणि करण जोहर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांसंदर्भात अश्लील विधान करणे, आयटी अॅक्ट आणि एससी- एसटी अॅक्ट या कलमांतर्गत लूनी पोलीस ठाण्यात जोधपूरमधील सरेचा गावात राहणारे देवाराम मेघवाल यांनी तक्रार दाखल केली आहे. पोस्टाद्वारे मेघवाल यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज पाठवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता तपासाला सुरुवात केली आहे.

केवळ महिलांचा अपमान करुन थांबला नाही तर महापुरुषांचाही हार्दिक पांड्यांने अपमान केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पांड्याने अपमान केला असून यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी करण जोहरशी बोलताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर क्रिकेटजगतातून टीकेची झोड उडवली होती. बीसीसीआयने यावर कडक कारवाई करत दोघांनाही भारतीय संघातून काही काळासाठी वगळले होते. त्यानंतर सीईओनी त्याचे निलंबन मागे घेण्यात आले होते. सध्या भारतीय संघासोबत पांड्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे. तर लोकेश राहुल स्थानिक सामन्यात खेळत आहे. करण जोहरने या घटनेनंतर दिलगिरी व्यक्त केली होती.

Leave a Comment