फेसबुकच्या मेसेजर मधूनही आता डिलीट करू शकता मेसेज

messenger
जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुककडून दरवेळे आपल्या युजर्सना नवनवीन फिचर्स उपलब्ध करुन दिले जातात. त्यात आता आणखी एक नवे फिचर युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यासाठी कंपनी कायमच प्रयत्नशील असते. ज्याप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज केला आणि तो तुम्हाला डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. फेसबुकवरही त्याचप्रमाणे एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे.

आता लवकरच फेसबुक मेसेंजरचे युजर्स एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करु शकणार आहेत. युजरकडे 10 मिनिटांचा वेळ मेसेज डिलीट करण्यासाठी असेल, म्हणजे मेसेज पाठवल्याच्या 10 मिनिटांमध्येच हा मेसेज डिलीट करता येणार आहे. मेसेंजरमध्ये यासाठी अनसेंड असे एक बटण देण्यात येणार आहे. आयओएस आणि अँड्राइडमधील काही व्हर्जनमध्ये हे नवे फिचर सुरू झाले आहे. लवकरच हे फीचर सर्व मेसेंजरमध्ये उपलब्ध होणार आहे.

हे फीचर गेल्यावर्षी जून महिन्यात तयार केले होते. एप्रिल महिन्यात स्वत: हे फीचर मार्क झुकेरबर्ग यांनी वापरले होते तेव्हा हे फिचर चर्चेत आले. हे फीचर फेसबुकचीच मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट या अॅप्लिकेशन्ससाठीही उपलब्ध आहे. मेसेज अनसेंड म्हटल्यावरही एकदा कन्फर्मेशन घेतले जाणार आहे. त्यामुळे फेसबुक मेसेंजरवर व्हॉट्सअॅपप्रमाणे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

Leave a Comment