जिओ फोन आता घेऊन येत 4500 रुपयात टचस्क्रीन फोन

Jio
टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पदार्पण केल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. त्यात त्यांनी स्वस्तातले फिचर फोन आणून धमाका केला होता. त्यांच्या जिओ फोन आणि जिओ फोन 2ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता जिओ आपला जिओ फोन 3 घेऊन येत असून हा फोन टचस्क्रिन असणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जून 2019मध्ये जिओ फोन 3 बाजारात येणार आहे. २०१७ मध्ये पहिल्यांदा रिलायंसने जिओ फोन लाँच केला होता. पहिल्या फोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर जिओ फोन २ आणला. टेलिकॉम क्षेत्रात या दोन्ही फोनला चांगले यश मिळाले. जिओ फोन ३ जूनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

जिओ फोनने मोबाइल क्षेत्रामध्ये अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत आपले नाव कमावले आहे. सध्या भारतातील अव्वल १० ब्रँडमध्ये जिओ फोनने स्थान मिळवले आहे. सध्या भारतीय मार्केटमध्ये फिचर फोनच्या बाबतीत जिओ फोन अव्वल स्थानावर आहे. BeetelBite च्या रिपोर्ट्सनुसार, रिलायंस जिओफोन 3 ची किंमत ४, ५०० रूपये असणार आहे.

या फोनमध्ये पाच इंचाचा डिस्प्ले, 2 GB रॅम, 64 GB इंटरनल स्टोरेज, मायक्रो एसडी स्लॉट, टचस्क्रीन, पाच मेगा पिक्सलचा रिअर तर दोन मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येणार आहे.

Leave a Comment