भारत बनला जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक देश

lpg
भारत जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक देश बनला आहे. तसेच 2025 पर्यंत भारतातील एलपीजी गॅसची मागणी 34 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय तेल सचिव एम एम कुट्टी यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे ही माहिती दिली. ‘एशिया एलपीजी शिखर परिषदे’त बोलताना कुट्टी म्हणाले, की देशातील एलपीजी ग्राहकांची संख्या वार्षिक 15% दराने वाढली आहे ही संख्या 2014-15 मध्ये 14.8 कोटी एवढी होती ती आता 2017-18 मध्ये 22.4 कोटींपर्यंत पोचली आहे. ग्रामीण भागांमध्ये झालेला मोठ्या प्रमाणावर विस्तार तसेच एकूण ग्राहकांकडून होणारा वापर यामुळे भारत हा जगातील एलपीजी ग्राहकांमध्ये चीनच्या खालोखाल दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा एलपीजीचा वार्षिक वापर दोन कोटी 25 लाख टन एवढा आहे, असे त्यांनी सांगितले.

मार्च 2020 पूर्वी आम्ही आठ कोटी घरांना एलपीजी कनेक्शन देऊ, असा दावा त्यांनी केला. या यशामागे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा हात असल्याचेही कुट्टी म्हणाले.

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना या योजनेंतर्गत महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन पुरविण्यात येतात. या योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील 5 कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Leave a Comment