अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फायदा होणार भारताला – राष्ट्रसंघ

us-china

जगातील दोन बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे, असा अंदाज राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियम वस्तूंवर शुल्क लावण्याची घोषणा केली होती. ट्रम्प् यांनी 375 अब्जि डॉलरचा द्विपक्षीय तोटा कमी करण्यासाठी करवाढीचा निर्णय घेत चीनवर दबाव आणला होता. त्याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर शुल्क लागले होते. तेव्हापासून या दोन देशांमध्ये व्यापार युद्ध भडकले आहे. या युद्धाचा सर्वाधिक फायदा युरोपीय महासंघातील देशांना होणार असून त्यांची निर्यात 70 अब्ज डॉलरनी वाढणार आहे. जपान आणि कॅनडा यांची निर्यात प्रत्येकी 20 अब्ज डॉलरनी वाढेल, असा अंदाज राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकास परिषदेने व्यक्त केला आहे.

तसेच या व्यापार युद्धामुळे भारताची निर्यात साडेतीन टक्क्यांनी वाढेल. असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
या व्यापार युद्धामुळे चीनने गेल्या वर्षी भारतासह आशिया-पॅसिफिक देशांच्या मालावरील आयात कर 1 जुलैपासून घटविले होते. भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश, लाओस आणि श्रीलंकेतून आयात सोयाबीनवरील तीन टक्के आयात कर शून्य टक्केा करण्यात आला होता.

Leave a Comment