‘५९ मिनिटात कर्ज योजने’च्या माध्यमातून एसबीआय करते रोज ५० प्रकरणे मंजूर!

SBI
बंगळुरू – ५९ मिनिटात कर्ज मंजूर करण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली असून या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया दरदिवशी ५० कर्ज प्रकरणे मंजूर करत असल्याची माहिती एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी दिली. एसबीआयने बँक आणि कर्ज या विषयावर ‘योनो २० अंडर २०’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी रजनीश म्हणाले, की बँकेकडे येणाऱ्या कर्ज प्रकरणाच्या मंजुरीचे प्रमाण हे ९० टक्के असायला हवे.

५९ मिनिटात कर्ज मंजूर करण्यासाठी जीएसटी रिटर्न, तीन वर्षे आयकर परतावा भरल्याची कागदपत्रे, एका वर्षाचे बँकेचे स्टेटमेंट, सिबील स्कोअर ही कागदपत्रे सादर करावे लागतात. ही सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर अर्जदाराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. त्यानुसार बँक पात्र अर्जदाराला ५ कोटीपर्यंत कर्ज देते.

यादरम्यान रजनीश यांनी सर्व बँकेच्या खातेदारांचा डाटा सुरक्षित असल्याचेही स्पष्ट केले. योनोचे ६.१ वापरकर्ते आहेत. शेतकरी अॅपची सुविधा एसबीआय देणार आहे. यामध्ये ८ प्रादेशिक भाषा असणार आहेत. शेतकऱ्यांना त्यातून हवामान, बियाणे आणि कर्जाबाबतची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत करणे हे कर्जमाफीहून अधिक फायदेशीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एसबीआयकडून देशात सर्वात अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येतात.

Leave a Comment