सन ऑफ सरदारने एकाचवेळी केली ६ रोल्स रॉइसची खरेदी

reubensing
रोल्स रॉइस या ब्रिटीश कारभोवती एक वेगळेच वलय आहे. ही महागडी कार केवळ पैसे आहेत म्हणून कुणालाही विकली जात नाही. तर कार कुणाला विकायची याचा निर्णय कंपनी घेते. त्यामुळे अनेकांना इच्छा आणि पैसे असूनही ही कार विकत घेता येत नाही. भारतीय वंशाच्या ब्रिटनवासी रुबेनसिंग हे उद्योजक सध्या जगभरात चर्चेत आले आहेत आणि त्याचे कारण आहे त्यांनी एकाचवेळी ६ रोल्स रॉइस कार खरेदी केल्या असून त्यासाठी ५० कोटी रुपये मोजले आहेत. कार्सच्या किल्ल्या कंपनीचे सीईओ टॉर्स्टन मुलर मुलर ओटवोस यांनी स्वतः आणून दिल्या आहेत.

rolls
रुबेनसिंग यांच्या ताफ्यात आता १५ रोल्स रॉइस गाड्या झाल्या असून गेल्या वर्षी त्यांनी ७ वेगळ्या रंगाच्या रोल्स रॉइस कार्स सोबत मॅचिंग रंगाच्या पगड्या घालून काढलेले स्वतःचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले होते. रुबेन यांनी नवीन घेतलेल्या सहा कार्सना ज्युवेल्स ऑफ कलेक्शन बी सिंग असे नाव दिले असून यातील ३ कार्स फँट, तर एक एसयूव्ही कलिनन आहे. या गाड्यांचे रंग माणिक, पाचू, नील या रत्नांप्रमाणे आहेत. रुबेन यांना ब्रिटनचे बिल गेट्स म्हणूनही ओळखले जाते.

रुबेन यांनी व्यवसायाची सुरवात रिटेल चेन पासून केली होती. त्यांनी नंतर ही चेन विकून टाकली आणि आता ते ऑलडेपीए तसेच इशर कॅपिटल या खासगी इक्विटी फर्मचे सीईओ आहेत. त्यांच्या ताफ्यात बुगती वेरोन, पोर्शे ९१८ स्पायडर, पगानी हुयरा, लाम्बोर्गिनी हुरकेन अश्या कार्सहि आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे जगातील एकमेव फेरारी एफ १२ बर्लिन संस्करण कारही आहे.

Leave a Comment