शाओमी भारतीय बाजारात विकणार स्मार्टशूज

shoes
भारतीय स्मार्टफोन बाजारात चांगलीच मुसंडी मारल्यानंतर चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आता पादत्राणे बाजारावर कब्जा करण्यासाठी सज्ज झाली असून त्यांचे स्मार्टशूज बाजारात लवकरच दाखल होत आहेत. शाओमी इंडियाने ट्विट हँडलवर त्याचे फोटो शेअर केले आहेत.

शाओमी गेली दोन वर्षे चीनी बाजारात स्मार्टशूज विकत आहे. कंपनीने २०१७ मध्ये मिजीया स्नीकर्स लाँच केले आणि २०१८ मध्ये स्नीकर्स २ लाँच केले असून हेच शूज भारतीय बाजारात आणले जाणार आहेत. फोटोखाली दिलेल्या टॅग लाईनमध्ये रेडी टू पुट युवर बेस्ट फुट फॉरवर्ड असे लिहिले गेले आहे. हे शूज साधारण ३ हजार रुपयात मिळतील आणि ते ब्लॅक, फ्लोरल ब्ल्यू, फ्लोरल ग्रे आणि व्हाईट रंगात उपलब्ध होतील.

हे शूज युनिमोल्डिंग प्रोसेसने बनविले गेले असून त्यात पाच प्रकारच्या मटेरियलचे मिश्रण केले गेले आहे. या शूजचे वजन २६० ग्राम असून ते वॉशिंग मशीनमध्ये धुता येतात असे समजते.

Leave a Comment