भारतात कमाईबाबत हॉलीवूड बॉलीवूडवर भारी

hollywood
विकी कौशलच्या उरी सर्जिकल स्ट्राईकने बॉक्स ऑफिसवर २०० कोटीची पायरी गाठली असली तरी सध्या कमाई बाबत भारतात बॉलीवूडवर हॉलीवूड भारी पडत असल्याचे दिसून आले आहे. गेली सहा वर्षे हाच ट्रेंड असून हॉलीवूडच्या कमाईचा वेग प्रचंड आहे. २०१३ ते २०१८ या काळात हॉलीवूड चित्रपटांची कमाई भारतात १५७ टक्क्यांनी तर बॉलीवूडच्या कमाईत २८ टक्के वाढ झाली आहे. हाच वेग चालू वर्षात कायम राहिला तर हॉलीवूडची कमाई यंदा १ हजार कोटींवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहाटा यासंदर्भात बोलताना म्हणाले, हॉलीवूडचा स्वीकार भारतीयांनी केला आहे असा याचा अर्थ आहे. पूर्वी निवडक शहरात हे चित्रपट दाखविले जायचे आता अनेक शहरात ते दाखविले जात आहेत. तसेच जादा स्क्रीन उपलब्ध होत असल्यानेही त्यांचा व्यवसाय वाढतो आहे. सर्व भारतीय भाषात मिळून दरवषी १००० चित्रपट तयार होतात तर हॉलीवूड मध्ये साधारण ५०० चित्रपट होतात आणि त्यातले २०० भारतात दाखविले जातात.

यंदाच्या वर्षात सर्वाधिक खर्च केलेला एव्हेंजर्स एंड गेम हा चित्रपट दाखल होत अशे. त्याच्या निर्मितीसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. भारतात एक चित्रपट सरासरी १० ते १५ कोटी रुपयात बनतो. तर हॉलीवूड मध्ये हे प्रमाण २७० कोटी असे आहे. शिवाय हॉलीवूड चित्रपट जगभर दाखविले जातात.

Leave a Comment