पासवर्ड नसल्याने या कंपनीत अडकले अब्जावधी रुपये

crypto
घरात पैशांनी गच्च भरलेली तिजोरी आहे पण किल्ली हरवली तर काय परिस्थिती होते याचा अनुभव क्वाड्रीगा डिजिटल एक्स्चेंज कंपनीला येत आहे. या ऑनलाईन स्टार्टअप कंपनीचे सीईओ गेराल्ड कॉटन हे भारतात आले असताना ९ डिसेंबर रोजी तब्येत अचानक बिघडल्याने मरण पावले. मात्र त्यांनी कंपनीचा पासवर्ड सुरक्षेसाठी कुणालाच न सांगितल्याने या कंपनीत गुंतवणूकदरांचे १४०० कोटींचे आभासी चलन अडकून पडले आहे. या क्रीप्टोकरन्सी ट्रेडिंग कंपनीने बिटकॉइन, लिटकॉइन, इशर अश्या दुसऱ्या डिजिटल टोकन मध्ये गुंतवणूक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीच्या वॉलेटचा अॅक्सेस फक्त गेरोल्डकडे होता. गेली पाच वर्षे ते हि कंपनी चालवीत आहेत. गेराल्ड नेहमीच सुरक्षेबाबत खूप दक्ष होते. त्यामुळे त्यांनी लॅपटॉप, ईमेल व सर्व मेसेजिंग चॅनल्स कडक सुरक्षेत एन्क्रीप्ट करून ठेवली आहेत. गेराल्ड च्या पत्नीने ही माहिती न्यायालयात दिली. त्या म्हणाल्या फंड गोळा करणे, कॉइंस घेणे बँकिंग पासून अकौंट पर्यंतची सर्व कामे गेराल्ड स्वतः करत असे. त्याने कॉइन्सचा मोठा साठा कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला असून त्याचे कोणतेही पासवर्ड किंवा बिझिनेस रेकॉर्ड नाही. त्याचा संगणक हॅक करण्यासाठी अनेक तज्ञ हॅकर्सना बोलावले गेले मात्र पासवर्ड मिळू शकला नाही.

परिणामी या कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदरांसाठी फर्मच्या वेबसाईटवर नोटीस जरी केली असून काही आर्थिक कारणाने ग्राहकांसाठी दिली जात असलेली सेवा उपलब्ध करून देऊ शकत नाही असे कळविले आहे. या सर्व प्रकरणाची आता न्यायालयात केस सुरु आहे.

Leave a Comment