अभिषेक फ्लॉप हिरो, पण २०६ कोटी संपत्तीचा मालक

abhishek
बॉलीवूड व्यापून राहिलेल्या बिगबी चा मुलगा अभिषेक बच्चन सिनेसृष्टीत फार यशस्वी झालेला नाही. ५ फेब्रुवारीला त्याने ४३ वा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला भरपूर शुभेच्छा दिल्या. अभिषेकच्या काही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला असला तरी त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळले असल्याने त्याच्यावर फ्लॉप असा शिक्का बसला आहे.

अभिषेक आर्थिक दृष्ट्या अयशस्वी मानला जात असला तरी त्याची संपत्ती २०६ कोटींची असल्याचे फिनअॅप डॉट को इनच्या २०१८ सालच्या अहवालात नमूद केले गेले आहे. त्यानुसार अभिषेकने साडेचार कोटी रुपये चित्रपटातून मिळविले आहेत. त्याची खासगी गुंतवणूक १३२.८ कोटी असून २०११ मध्ये त्याने ३६.५ कोटीचा बंगला विकत घेतला आहे. त्याची वर्षाची कमाई २० कोटी असून त्याला महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेन्झ, रेंज रोव्हर, बेंटली, जग्वार अश्या कार्स आहेत.

Leave a Comment