‘या’ फोटोला अमिताभ बच्चन म्हणाले फेक !

picselft
एक चित्र एक हजार शब्दांच्या बरोबरीचे असतात असे म्हटले जाते (A picture is worth a thousand words). ही म्हण खरी ठरत आहे. ती सद्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे….

हा फोटो बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर, बोमन इरानी आणि टीव्ही अभिनेता राम कपूर यांच्यासह अनेकांनी शेअर केला आहे. या फोटोत काही मुले चप्पल घेऊन सेल्फी काढताना दिसत आहेत. या फोटोत मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा आहे. अनेक लोक चांगल्या सेल्फी फोटोसाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यातच या मुलांच्या सेल्फी फोटोने सर्वांना फॅन बनवले आहे. या मुलाच्या फोटोला अनेकांनी लाइक्स आणि शेअर्स केले आहेत.

अभिनेता अनुपम खेर यांनी नुकताच हा फोटो शेअर केला आणि म्हणाले, “Things turn out best for the people who make the best of the way things turn out.”

टीव्ही अभिनेता राम कपूर यांनी हा फोटो शेअर करून लिहिले की … Being rich isn’t as important as being happy… this pic speaks volumes म्हणजेच आनंदी होण्यासाठी तुम्ही श्रीमंत असणे जरुरी नाही आणि हा फोटो याचे उत्तम उदाहरण आहे.


एकीकडे या फोटोला लाखों लाईक्स मिळत आहेत. मात्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या फोटोला फोटोशॉप असल्याचे म्हटले आहे. या मुलांच्या हातामध्ये भिन्नता दिसून येत आहे. म्हणजेच या मुलाचा हात फोटोशॉपमध्ये एडिट करुन लावला आहे. परंतु चित्रपट निर्मिते अतुल कासबेकर यांनी ट्विट करुन हा फोटो फोटोशॉप मध्ये एडिट केला नाही असे म्हटले आहे. आता पर्यंत या फोटोला अनेक शेअर्स आणि लाईक मिळाले आहेत.

Leave a Comment