नेहा कक्कर एका गाण्यासाठी घेते एवढे मानधन

neha-kakkar
नेहा कक्कर हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही. नेहा सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये आघाडीची गायिका आहे. त्याचबरोबर आपण दिवसभरात जी गाणी ऐकत असाल त्यात नेहाची किमान पाच गाणी तर असतातच. तसेच बॉलीवूडमधील प्रत्येक संगीतकाराला नेहाने आपल्यासाठी गाणे गावे असे वाटत असते. नेहाचा चाहतवर्ग ही मोठा आहे.
neha-kakkar1
पण नेहाला हे यश मिळविण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला हे मोजक्याच जणांना माहित असेल. नेहाने सर्वप्रथम 2006 साली इंडियन आयडॉलमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. पण या स्पर्धेतून अंतिम फेरी आधीच बाद झाली. त्यानंतर नेहाने हार मानली नाही आणि आपला संघर्ष कायम ठेवत यशस्वी गायिका बनली आणि ज्या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी झालेली नेहा त्याच स्पर्धेची परीक्षक म्हणून सर्वांच्या समोर आली.
neha-kakkar2
नेहा आणि तिचा भाऊ टॉनी कक्करने मिळून युट्यूबवर एक गाणे शेअर केले. त्यांचे हे गाणे ऐवढे हिट झाले की तिला बॉलिवूडची दारे उघडी झाली. यानंतर नेहाने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर नेहाने एकाहून एक हिट गाणी दिली. नेहाचे नाणे सध्या बॉलिवूडमध्ये खणखणीत वाजत असल्यामुळे ती एका गाण्याचे जवळपास १५ ते २० लाख रुपये घेते. आज नेहाची मालमत्ता ५० कोटींच्या आसपास आहे. नेहाकडे आज ते सर्वकाही आहे ज्याची तिने फक्त स्वप्न पाहिलेली.

Leave a Comment