संधीसाधू चंद्राबाबूंसाठी एनडीएचे दरवाजे कायमचे बंद – अमित शहा

amit-shah
श्रीकाकुलम – आंध्र प्रदेशमधील सभेत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर भाजप अध्यक्ष अमित शहांनी जोरदार हल्लाबोल केला. भाजपच २०१९ ला केंद्रात पुन्हा सत्तेत येईल तुमचे मुख्यमंत्री नायडू तेव्हा पुन्हा एनडीए गटात येण्याचा प्रयत्न करतील. पण मी त्यांना सांगू इच्छितो, की एनडीएचे दरवाजे यावेळी संधीसाधू चंद्राबाबूंसाठी कायमचे बंद झाले असतील अणि नायडूंना भविष्यातही एनडीएत नो एन्ट्रीच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसमधून नायडूंनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी सत्ता तिथे आम्ही म्हणत सारखे पक्ष बदलल्याचा दाखला शहांनी यावेळी दिला. त्यांनी काँग्रेस सोडून एनटीआर यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. त्यांनी तेथे राजकीय आसरा देणाऱ्या एनटीआर यांनाच दगा देत सत्ता आणि पक्ष दोन्ही हस्तगत केल्यानंतर स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही हे कळाल्यावर ते एनडीएच्या गोटात आले. ते आता एनडीए सोडून काँग्रेससोबत गेल्याचे शहा यावेळी म्हणाले.

नायडूंनी काँग्रेस सोबत जाऊन एनटीआर आणि तेलगू अस्मितांची गळचेपी केल्याचे शहा म्हणाले. आंध्र प्रदेशसोबत केंद्र सरकारने अन्याय केल्याच्या नायडूंच्या या आरोपाचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. भाजपने काँग्रेसच्या कार्यकाळात दिला गेला त्यापेक्षा १० पट अधिक निधी या पाच वर्षात आंध्र प्रदेशला दिल्याचे शहा म्हणाले. राज्याच्या विकासाचे नायडूंना काही देणेघेणे नसून फक्त भ्रष्टाचारातच स्वारस्य असल्याचेही ते म्हणाले. घराणेशाहीवर चालणाऱ्या टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसला पाठिंबा देण्याऐवजी भाजपला मत देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.

Leave a Comment