जुआन गुआदोंना व्हेनेझुएलाचे नवे राष्ट्राध्यक्ष

president
कॅराकस – स्पेन, फ्रान्स आणि स्वीडनने दिलेल्या इशाऱ्यानुसार आठ दिवसात निवडणुका घेण्यास घेण्यास व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलास मदुरो यांनी नकार दिला आहे. मदुरोंना या देशांनी दिलेली आठ दिवसांची मुदत उलटून गेली असल्यामुळे विरोधी नेते जुआन गुआदोंना व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून या देशांनी मान्यता दिली असल्याची माहिती ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेरेमी हंट यांनी ट्विटरवरून दिली.

गेल्या काही महिन्यांपासून व्हेनेझुएला हा देश आर्थिक संकटात सापडला आहे. राष्ट्राध्यक्षांविरोधात देशभरातून मोठ्या प्रमाणात निदर्शने होते आहेत. सरकारने या आंदोलनाला दडपण्यासाठी आक्रमकपणे पोलीस बळाचा वापर सुरू केल्याने तेथील परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. व्हेनेझुएलातील अराजकतेचे प्रमाण एवढे वाढले आहे की, तेथील लोक देश सोडून शेजारच्या कोलंबियात आसरा घेण्यासाठी पलायन करत आहेत. व्हेनेझुएलातील लोकांवर वाढत्या महागाईमुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आली असून याचा सर्व संताप ते राष्ट्राध्यक्ष मदुरो यांच्याविरोधात आंदोलन करून काढत आहेत.

Leave a Comment