ब्रेक्झिटमुळे श्रीमंत भारतीयांची चांदी – मुंबई, दिल्लीपेक्षा लंडनमध्ये घरे स्वस्त

London

येत्या मार्चमध्ये ब्रिटन युरोपीय महासंघ आतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे ब्रिटनमधील घरांच्या बाजारपेठेत उलथापालथ झाली असून घरांच्या किमती कोसळल्या आहेत. याचा फायदा श्रीमंत भारतीयांनी घेतला असून भारतीय व्यक्तींकडून घर खरेदीला जोर आला आहे.

लंडनमध्ये महत्त्वाच्या भागामधील घरांच्या किमती 5 ते 7 टक्क्यांनी आहेत. येथे एक वर्षात या किमती 10 टक्यांे पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा धनवान भारतीयांनी उचलला असून संपूर्ण ब्रिटनमध्ये भारतीयांकडून घर खरेदीत 15-20 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे ब्रिटनमधील बांधकाम व्यवसायिक आहे आणि रिअल इस्टेट एजंटांचे म्हणणे आहे.

लिव्हरपूल स्ट्रीट, ऑक्सफोर्ड स्ट्रीट, बाँड स्ट्रीट आणि बेकर स्ट्रीट यांसारख्या उच्चभ्रू भागांतील मध्यम आकाराची अपार्टमेंट्स 10 ते 15 लाख पौंड (9 ते 14 कोटी रुपये) एवढ्या किंमतीला विकली जात आहेत. त्याच आकाराच्या लूट्येन दिल्ली किंवा दक्षिण मुंबईतील घरांच्या किमती दुप्पट आहेत. बर्मिंगहॅम आणि मँचेस्टर यासारख्या शहरांमधील घरांच्या किमती पुणे किंवा नाशिक या शहरातील किमतींएवढ्या कमी आहेत, असे इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्राने म्हटले आहे.

जेएलएल, सॅव्हिल्स, राईटमूव्ह आणि सीबीआरई यांसारख्या सल्लागार संस्थांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार इंग्लंडमध्ये घरांच्या किमती आणखी कोसळण्याची शक्यता आहे. ब्रेक्झिटच्या अनिश्चिततेसोबतच घरगुती बजेटवर येणारा ताण यामुळे येत्या काही महिन्यात घरांची मागणी कमी राहील, असे रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स या संस्थेने म्हटले आहे.

Leave a Comment