तुम्ही पाहिली आहे का अनुष्कासारखी डुप्लिकेट ?

anushka-sharma
जगात एकसारख्या दिसणाऱ्या सात व्यक्ती असतात, असे आजवर आपल्या ऐकण्यात आले असेलच. त्यातच सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे एवढे प्रभावी माध्यम बनले आहे की ज्यामुळे येथे पोस्ट केलेला व्हिडीओ किंवा फोटो एक झटक्यात व्हायरल होतो. सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींशी मिळत्याजुळत्या व्यक्तींचे फोटो व्हायरल झाले आहेत. सध्या अभिनेत्री अनुष्का शर्माच्या डुप्लिकेटचे फोटो व्हायरल होत आहेत.
anushka-sharma1
अनुष्काप्रमाणे दिसणारी अमेरिकन तरुणी ही असून तिचे नाव ज्युलिया मायकल्स असे आहे. अनुष्का आणि ज्युलियाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट्चा पाऊस पडत आहे. इन्स्टावर ज्युलियाने आपले काही फोटो शेअर केले असून ती यात हुबेहूब अनुष्काप्रमाणे दिसत आहे.
anushka-sharma2
ज्युलिया आणि अनुष्काचा फोटो काही नेटकऱ्यांनी कोलाज केला आहे. अनेकांनी हे फोटो पाहुन अनुष्कावर प्रश्नाचा भडीमार केला आहे. अनुष्का ही तुच आहेस का ? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर काहींनी अडनाव बदलले का ? असाही प्रश्न विचारला आहे. दरम्यान, अनुष्काप्रमाणे दिसणारी ज्युलिया एक लेखिका असून ती गायिकाही आहे. २०१७मध्ये ज्युलियाने संगीतक्षेत्रात पदार्पण केले आहे. तिचा इशूज हा सोलो अल्बम याच वर्षी रिलीज झाला आहे.

Leave a Comment