ऑनलाईन डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगलचा मोलाचा सल्ला

google
नवी दिल्ली – आपला ऑनलाईन डाटा सुरक्षित आहे की नाही याची चिंता अनेकांना भेडसावत असते. पण टेन्शनचे काम नाही. कारण डेटा सुरक्षित राहण्यासाठी वापरकर्त्यांना खुद्द गुगलनेच डेटावर नियत्रंण ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

गुगलने अॅपला तसेच मोबाईलला पासवर्ड ठेवावा, असे म्हटले आहे. ५ फेब्रुवारीपासून गुगल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘#SecurityCheckKiya ही मोहीम सुरू करणार आहे. आपले जगणे आणि काम करण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाने प्रभावीत केले आहे. वापरकर्त्याला अशा स्थितीत इंटरनेटवर सुरक्षित असण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत जाणून घेण्याची इच्छा असते. त्यांचा डाटा इंटरनेटवर सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यासाठी आम्ही सर्वप्रकारे प्रयत्न करत असल्याचे गुगल इंडियाच्या (ट्रस्ट अँड सेफ्टी) संचालिका सुनिता मोहंती यांनी सांगितले.

गुगलची उत्पादने ही अत्यंत सुरक्षित असून सातत्याने आणि स्वयंचलित पद्धतीने ते वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यरत असतात. थर्ड पार्टी वेबसाईट व अॅप्सला परवानगी दिल्यानंतर आपली माहिती काय दिली जात आहे, हे वापरकर्त्याला माहीत असणे आवश्यक आहे, असे मोहंती यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. विशेषत: तरुण आणि पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असा त्यांनी सल्ला दिला. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वापरकर्त्याला शिक्षण दिले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

Leave a Comment