ऑस्ट्रेलियात अभूतपूर्व पूर, मगरी आल्या रस्त्यावर

austreliya
गेल्या १०० वर्षात आला नाही इतका प्रचंड पूर ऑस्ट्रेलियातील काही राज्यात आला असून त्यामुळे हजारो लोक घरे सोडून गेले आहेत तर २० हजार घरे धोकादायक बनली आहेत. विशेष म्हणजे पुराच्या पाण्याबरोबर कित्येक मगरी रस्त्यावर आल्या असल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

crocodile
ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पश्चिम भागात क्वीन्सलँड राज्यातील टाउन्सवहिले शहरात पाणी भरले असून वीज गायब आहे. येथे लोकांनी घरांच्या छतावर आश्रय घेतला आहे. रॉस रिव्हर धरणातून प्रती सेकंद १९०० क्युबिक मीटर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पुढचे काही दिवस पूरपरिस्थिती बिकट होईल असा इशारा दिला गेला आहे. असा पूर गेल्या १०० वर्षात प्रथमच आल्याचे सांगितले जात असून पुढचे काही दिवस जोरदार वारे आणि मुसळधार पाउस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या भागातील शेकडो घरे रिकामी केली गेली आहेत असे समजते.

Leave a Comment