सोशल मिडियाला रामराम करून या गावात मुले शिकताहेत पैलवानी

pailvan
जगभरात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे मोबाईल आणि सोशल मिडिया वापरण्यात दिवसाचे अनेक तास घालावीत असताना राजस्थानातील पूर या गावी मात्र लहान थोर गावाची ८० वर्षे जुनी पैलवानी परंपरा जपण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत. ६ वर्षांच्या मुलांपासून ते ७५ वर्षाच्या आजोबांपर्यंत शेकडो रहिवासी पैलवानी शिकत असून त्यात ३५० मुले सामील आहेत. ७५ वर्षीय पैलवान कम्बरीलाल बिष्णोई त्यांना प्रशिक्षण देत आहेत.

या छोट्या गावात ४ आखाडे असून या गावाची ओळख पैलवानांचे गाव अशीच आहे. शिव व्यायामशाळेत ६ ते १५ वयोगटातील मुले रोज सकाळ संध्याकाळ तीन तीन तास पैलवानीचे डावपेच शिकतात. बिष्णोई सांगतात आमच्या गावात पण लहान मोठ्यांना मोबाईल आणि सोशल मिडियाचे वेड लागले होते. मात्र आम्ही गावाची पैलवानी परंपरा कायम राखण्यास्ठी या मुलांचे तसेच तरुणांचे प्रबोधन केले आणि त्यांना मोबाईल, सोशल मिडियापासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त केले त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.

या गावाने १०० हून अधिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक विजेते पैलवान घडविले आहेत. राज्यपातळीवर २०० हून अधिक पैलवान कुस्ती खेळले आहेत. आता तर मुलीही पैलवानी शिकत असून अश्या २० मुलीना पैलवानीचे प्रशिक्षण दिले जात आहे.

Leave a Comment