येतोय १८ हजार एमएएच बॅटरीवाला स्मार्टफोन

enerjaizer
यावर्षी अनेक नवे स्मार्टफोन लाँचिंगच्या तयारीत आहेत आणि त्यातील काही फोनची फिचर तर आश्चर्यकारक म्हणावी अशी आहेत. फोनसाठी बॅटरी बनविणाऱ्या एनर्जायाझर कंपनीने बार्सिलोना येथे होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये २६ स्मार्टफोन सादर करणार असल्याची घोषणा केली असून त्यात १८ हजार एमएएचची बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचा समावेश आहे. अन्य फोनमध्ये पॉपअप सेल्फी कॅमेरे, फोल्डेबल डिस्प्ले अश्या फोनचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एनर्जायाझर प्रत्येक सेग्मेंट मध्ये फोन सादर करणार आहे. कंपनी अल्टीमेट यु ६२० एस पॉप आणि यु ६३० एस पॉप असे दोन नवे स्मार्टफोन सादर करेल असा अंदाज वर्तविला जात असून हे दोन्ही ड्युअल सेल्फी पॉप कॅमेरे फोन असतील. यु ६३० एसला १६, ५ आणि दोन एमपीचा रिअर ट्रिपल कॅमेरा दिला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. हे फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सह येतील. पॉवर मॅक्स पी १६ के प्रो या फोनची बॅटरी १६ हजार एमएएचची असेल असे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment