या खास गोडीच्या गुळाला विदेशातूनही मागणी

gudd
आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट असलेला गुळ हा पदार्थ गुणाची खाण आहे. देशात उसाच्या हंगामात अनेक ठिकाणी गुऱ्हाळे सुरु होतात आणि तेथे उसाच्या रसापासून गूळ बनविला जातो. पंजाबमधील होशियारपूर येथील एका पंजाबी कुटुंबात सेंद्रिय उसाच्या रसापासून पारंपारिक पंजाबी पद्धतीने गूळ बनविला जात असून या गुळाची गोडी काही और आहे. त्यामुळे या गुळाला केवळ देशातूनच नाही तर परदेशातून मागणी असून गूळ मिळविण्यासाठी आगावू नोंदणी करावी लागते.

या कुटुंबातील जसविंदरकौर पदवीधर असून त्या शिकत असल्यापासून आई वडिलांना गुऱ्हाळात मदत करतात. त्या सांगतात आमचा उस सेंद्रिय पद्धतीने पिकविला जातो आणि गुळ तयार करताना रसायने वापरली जात नाहीत. दररोज १०० किलो गुळ पारंपारिक पद्दतीने तयार केला जातो मात्र मागणी खूप असल्याने तो पुरेसा होत नाही. सेंद्रिय शेती करून उस पिकविणाऱ्या अन्य शेतकऱ्यांकडून आम्ही उस खरेदी करतो. आमच्या गुळाला कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियातून मागणी आहे.

गूळ तयार करण्याचा सिझन नोव्हेंबर ते मार्च पर्यंत असतो मात्र वर्षभर त्याची तयारी सुरु असते. या गुळाच्या गोडीची चर्चा इतकी पसरली कि आम्ही उसाची लागवड वाढविण्याचा निर्णय घेतला. थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन अतिशय उपयोगी असते. कारण त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि पोषक तत्वे आहेत. नोंदणी केलेले लोक ज्या दिवशी डिलिव्हरी मिळणार त्याच्या अगोदर गुळात घालायला शेंगदाणे, बदाम, खोबरे, ओवा, साजूक तूप, सुंठ असे पदार्थ देतात मग ते घालून त्यांचा गूळ बनविला जातो.

Leave a Comment