फेसबुकवर २५ कोटीपेक्षा अधिक फेक अकौंट

fake
फेसबुक या सोशल साईटने जगात त्यांचे असे एक वेगळेच जग तयार केले आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये. मात्र फेसबुकवरील एमएयु म्हणजे मंथली अॅक्टीव्ह युजर्समध्ये २५ कोटी अकौंट फेक किंवा बनावट असल्याचे फेसबुकचा २०१८ च्या वार्षिक अहवालात स्पष्ट झाले आहे.

फेसबुकची एमएयु ची संख्या डिसेम्बर २०१५ मध्ये १ अब्ज ५९ लाख होती ती डिसेम्बर २०१८ मध्ये २.३२ अब्जांवर गेली आहे. दररोज फेसबुक वापरणारे किमान १ अब्ज युजर आहेत. ही संख्या लक्षात घेतली तर फेसबुक हा जगातील तीन नंबरचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकेल. फेसबुक युजर मधील कोट्यावधी युजर महिन्यातून किमान एकदा फेसबुक लॉगइन करून काही फीचर्स वापरतात.

फेसबुकवर जी बनावट खाती आहेत ती दोन प्रकारची आहेत. त्यात विविध संस्था, व्यवसाय यांच्या नावाची खाती आहेत तसेच काही खाती एकदम बनावट आहेत त्यांना स्पॅम म्हटले जाते. ही खाती काही उद्देशाने बनविली जातात आणि त्यांना सेवा देणे हे नियमाचे उल्लंघन समजले जाते. अशी खाती इंटरनल रिव्ह्यू मधून ओळखली जातात. फेसबुकवर अॅक्टीव्ह युजर्सची संख्या इतकी वाढण्यात भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांचे मोठे योगदान आहे.

Leave a Comment