पोस्टात ९ हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम बेवारशी

post
देशातील विविध पोस्ट कार्यालयातून विविध योजनांखाली गुंतविलेली ९ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम बेवारस पडून असल्याचे समजते. या रकमेवर क्लेम केले गेलेले नाहीत. पोस्टाच्या अल्पबचत योजनातून गुंतविली गेलेली ही रक्कम आहे. त्यात किसान विकास पत्र, मासिक आय योजना, राष्ट्रीय बचत पत्रे, भविष्य निर्वाह निधी, आवर्ती ठेव योजना आणि टाईम डिपॉझीट यांचा समावेश आहे.

पोस्टातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध बँकातूनही अशी बेवारस किंवा दावा न केलेल्या रकमा पडून असतात. त्यांना अन्क्लेम्ड मनी असे म्हटले जाते. या रकमा अन्क्लेम्ड अकौंट मध्ये ट्रान्स्फर केल्या जातात किंवा डीपॉझीट अवेअरनेस अँड एजुकेशन फंड मध्ये जमा करून त्यातून खातेदारांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेतले जातात. बँकांप्रमाणे पोस्ट त्यांच्याकडची अन्क्लेम्ड रक्कम वापरू शकत नाही त्यामुळे या रकमांना अन्क्लेम्ड न म्हणता सायलेंट मनी म्हटले जाते.

देशात अश्या रकमा जमा असण्यात प.बंगाल आघाडीवर असून तेथे १५९१ कोटी सायलेंट मनी आहे. त्याखालोखाल दिल्ली १११२ कोटी, पंजाब १०३४ कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातील पोस्ट कार्यालयांकडे ७२७ कोटी रुपये सायलेंट मनी आहे.

Leave a Comment