किम जोंग उन आणि रोड्रीगो दुतेर्ते यांचे डुप्लिकेट एकत्र

hamshakal
उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन आणि फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोद्रिगो दुतेर्ते एकत्र दिसतील तर ती जगातील महत्वाची आणि मोठी बातमी असेल हे कुणालाही समजेल. ही किमया या दोघांच्या डुप्लिकेट म्हणजे हमशकलनी हाँगकाँग मध्ये करून दाखविली असून त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी ते जेथे बसले होते त्या रेस्टॉरंटमध्ये लोकांनी एकच गर्दी केली होती.

किम जोंगचा तोतया हॉवर्ड आणि दुतेर्ते यांचा तोतया क्रीसेन्सियो एक्स्ट्रीम रविवारी एका चर्च मध्ये एकत्र आले. त्यावेळी त्यांचे वेश या दोन राष्ट्राप्रमुखांप्रमाणे होते. या दोघांनी नकली बंदुकाही हलवून दाखविल्या. नंतर ते एका रेस्टॉरंटमध्ये गेले व तेथे त्यांनी फ्राईड चिकनचा आस्वाद घेतला. होवार्ड ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असून त्याला कोरियन भाषा येत नाही. तो म्हणाला, किम जोंग सारखी केशभूषा करायला खूप श्रम पडले. त्यासाठी माझ्या हेअरड्रेसरने खूप मेहनत घेतली. त्यासाठी किम जोंग उनचा फोटो सर्च करून त्यानुसार केस कापावे लागले.

क्रीसेन्सियो एक्स्ट्रीम हा हुबेबुब दुतेर्ते यांच्यासारखा दिसतो. रेस्टॉरंट मध्ये या दोघांना पाहून एका महिलेने तुम्ही खरे दुतेर्ते आहात काय असा प्रश्न त्याला विचारला. या दोघांना पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी पाहता पाहता रेस्टॉरंटमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

Leave a Comment