मेक्सिकोच्या सीमेवर आणखी सैनिक तैनात करणार अमेेरिका

Soldier
मेक्सिकोला लागून असलेल्या नैऋत्य सीमेवर आणखी सैनिक तैनात करणार असल्याची घोषणा अमेरिकेच्या संरक्षण खात्याने रविवारी केली मेक्सिकोच्या सीमेवर. अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा दलाला (सीबीपी) मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या सीमेवर 3750 अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात येतील. हे अतिरिक्त सैनिक 90 दिवसांच्या कालावधीसाठी सीमेवर असतील. त्यामुळे येथे असलेल्या सीबीपीच्या सुरक्षा सैनिकांची संख्या 4350 एवढी होईल, असे पेंटागॉनने म्हटल्याचे सीएनएनने म्हटले आहे.

मेक्सिकोला लागून असलेल्या यासीमेवर 30 सप्टेंबरपर्यंत सैन्य अभियान चालू ठेवण्याची घोषणा पेंटागॉनने केली आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अंतर्गत सुरक्षा विभागाने विनंती केल्यानंतर पेंटागॉनने ऑक्टोबर 2008 मध्ये या सीमेवर 4500 सक्रिय सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले होते. . मेक्सिकोतून अमेरिकेत येणाऱ्या हजारो स्थलांतरितांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. ही मोहीम सुरूवातीला डिसेंबर 2018 मध्ये संपणार होती. तिला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी उभारण्याबाबत ट्रम्प आणि विरोधकांमध्ये मतभेद आहेत. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची गरज आहे. त्यासाठी 5.7 बिलियन डॉलर्सची गरज आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यावरून अमेरिकी सरकार ठप्प होण्याचीही वेळ आली आहे.

Leave a Comment