मी यामुळे नाकारला मणिरत्नम यांचा रावण

shahrukh-khan
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन या रिअल लाईफ कपलचा आणि मणिरत्नम यांचे दिग्दर्शन असलेला ‘रावण’ चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला. पण या चित्रपटासाठी अभिषेकआधी शाहरूखकडे विचारणा केली होती. या चित्रपटाला नकार देण्याचे कारण आता शाहरूखने स्पष्ट केले आहे.

मला नेहमीच मणिरत्नम यांच्यासोबत काम करणे आवडते आणि या चित्रपटात काम करण्यास मी होकार देखील देणार होतो. पण तीन भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटात काम करणे मला काहीसे अवघड वाटल्याने मी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता, असे शाहरूखने एका मुलाखती दरम्यान म्हटले आहे.

मणिरत्नम यांचा ‘रावण’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ अशा तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटात शाहरूखने काम न करण्यामागचे कारण काही वेगळेच असल्याचे म्हटले जात होते. ऐश्वर्या राय शाहरूखच्या चलते चलते चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. पण सलमानने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर येऊन घातलेल्या गोंधळानंतर याजागी राणी मुखर्जीला घेण्यात आले. ऐश्वर्यासोबत यानंतर स्क्रीन शेअर करणे टाळण्यासाठी शाहरूखने चित्रपटाला नकार दिल्याचे वृत्त त्यावेळी समोर येत होते. शाहरूख आणि ऐश्वर्याने त्याआधी ‘देवदास’, ‘मोहब्बते’ आणि ‘जोश’सारख्या चित्रपटांत स्क्रीन शेअर केली होती.

Leave a Comment