टेनिसच्या एटीपी मानांकनच्या टॉप फाईव्हमधून रॉजर फेडरर बाहेर

roger-fedrar
नवी दिल्ली – टेनिसच्या एटीपी मानांकनच्या टॉप फाईव्हमधून टेनिसचा बेताज बादशहा आणि स्वित्झर्लंडचा माजी अग्रमानांकित खेळाडू रॉजर फेडरर बाहेर फेकला गेला आहे. सध्या एटीपी मानांकनात फेडरर सहाव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच कायम आहे.

विम्बल्डन २०१८ च्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामन्यात आफ्रिकेच्या कोरी अँडरसनकडून रॉजर फेडरर पराभूत झाला होता. त्यानंतर फेडरर अमेरिकन ओपनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या निकी किरगीसकडून पराभूत झाला होता. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बिगर मानांकित ग्रीसच्या २० वर्षीय स्टेफोनस त्सित्सिपासकडून पराभूत झाला होता. सलग तीनही ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीपूर्वी फेडरर बाहेर पडला आहे.

१० हजार ९५५ अंकासह सर्बियाचा नोवाक जोकोविच पहिल्या स्थानावर विरजमान आहे तर ८ हजार ३२० अंकासह स्पेनचा राफेल नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. जर्मनीचा अलेक्झांडर झुवारेव तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावावर ६ हजार ४७५ गुण आहेत. अर्जेटिनाचा नुआना मार्टीन डेल पोट्रो ५ हजार ६० अंकासह चौथ्यास्थानी आहे. पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा कोरी अँडरसन ४ हजार ८४५ गुण आहेत. रॉजर फेडरर ४ हजार ६०० गुण आहेत. तो सहाव्या स्थानी फेकला गेला आहे.

Leave a Comment