आता ट्विटरवर देखील करता येणार खाडाखोड

tweet
सॅन फ्रान्सिस्को – अनेक सेलिब्रेटी किंवा राजकीय नेते आपण केलेल्या चुकीच्या ट्विटमुळे अनेकदा ट्रोल झाले असल्याचे पाहिले आहे. त्यातच ट्विटर ट्विट केल्यानंतर दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांची नाचक्की होते. पण लवकरच यातून ट्विटर युझर्सची सुटका होणार आहे. कारण लवकरच ट्विट दुरुस्त करण्याचा पर्याय ट्विटर उपलब्ध करुन देणार आहे.

सुरुवातीला ५ ते ३० सेकंद एवढा वेळ ट्विट प्रसिद्ध होण्यासाठी लागणार आहे. ट्विटर युझरला या दरम्यान आपले ट्विट दुरुस्त करता येणार आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्से यांना ट्विट दुरुस्तीचा पर्याय यापुर्वी का देण्यात आला नाही असे विचारले असता त्यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले की, ट्विट हे एसएमएस पद्धतीने शब्दांचे संदेश पाठविण्याचे माध्यम आहे. ट्विटरवर एकदा तुम्ही शब्द पाठविले, की तुम्हाला ते परत घेता येत नाहीत. तुम्ही ज्या क्षणी ट्विट करता, ते त्याच क्षणी प्रसिद्ध होतात. डॉर्से यांनी यापूर्वीही डिसेंबर २०१६ ट्विटमध्ये दुरुस्ती करण्याची शक्यता व्यक्त केली होती. अँड्राईडवर स्मार्टफोनवर लवकरच टाईमलाईनवर बातम्या दाखविणारे फीचर दिसणार आहे. त्यासाठी ट्विटरकडून सध्या चाचणी घेण्यात येत आहे.

Leave a Comment